Bade Miyan Chote Miyan Release Date: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार होता. पण आता बडे मियाँ छोटे मियाँ रिलीजची तारीख बदलण्यात आली आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट आधी 10 एप्रिलला रिलीज होणार होता. पण, आता रिलीजची तारीख काही काळ पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट एक दिवसानंतर म्हणजेच 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वतः अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी ही माहिती दिली आहे.
बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक BMCM चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत आता त्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी अजून एक दिवस वाट पाहावी लागेल.
बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 11 एप्रिल रोजी हिंदी तसेच तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा 👉 हा आहे सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, मिळत नव्हत एकही थिएटर.
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज.
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अक्षय कुमार सांगतोय कि, ‘मी आणि टायगर दोघे सध्या अबुधाबीमध्ये आहोत. आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आलो आहोत. येथे आम्हाला शेख मिहानकडून इफ्तारसाठी आमंत्रण आले होते, म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना भेटून आम्हाला खूप चांगले वाटले.
अक्षयने सांगितले, ‘आम्हाला समाजले की यूएईने 10 एप्रिलला ईद होणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ११ एप्रिलला भारतात ईद साजरी होणार आहे. व्हिडिओमध्ये टायगर म्हणतोय, ‘आम्ही नेहमी सांगत होतो की ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ फक्त ईदला प्रदर्शित होईल आणि आम्ही आमचे वचन पाळतोय आम्ही तुम्हाला ११ तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटू.
सध्या ट्रेंडिंग 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.
👉 बडे मियाँ छोटे मियाँ अॅडव्हान्स बुकिंग थंड, तोट्याची शक्यता.
अक्षय कुमारने दिल्या ईदच्या शुभेच्छा, अक्षय पुढे म्हणाला, ‘बडे मियाँ छोटे मियाँकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ईद मुबारक’.
🔥 BMCM च्या कमाईला उतरती कळा, जाणून घ्या लेटेस्ट कलेक्शन.