BMCM Advance Booking : टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा बडे मियाँ छोटे मियाँ 11 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या मैदानशी टक्कर होणार आहे.
BMCM आधी ख्रिसमस 2023 ला रिलीज होणार होता. रिलीजची तारीख नंतर ईद 2024 वर पुढे ढकलण्यात आली. 10 एप्रिल 2024 साठी प्री-बुकिंग विक्री सुरू करण्यात आली होती, परंतु चित्रपट रिलीजची तारीख सोमवारी 11 एप्रिलला पुढे ढकलण्यात आली.
ईद हा बॉक्स ऑफिसवर पैसा कमावून देणारा सर्वात मोठा सण आहे. ईद सीझनमध्ये सलमान खानने त्याचे अनेक चित्रपट रिलीज केले असून त्या चित्रपटांनी हजारो कोटींची कमाई केली आहे. यावेळी अक्षय कुमारचा बडे मियाँ छोटे मियाँ ईदला प्रदर्शित होत आहे.
सध्या ट्रेंडिंग 👉 हा आहे सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, मिळत नव्हत एकही थिएटर.
🔥 ट्रेंडिंग 👉बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज.
बडे मियाँ छोटे मियाँ पहिल्या दिवसाचे ॲडव्हान्स बुकिंग
मीडिया रिपोर्टनुसार, बडे मियाँ छोटे मियाँने पहिल्या दिवशी आगाऊ बुकिंगद्वारे 44 लाख (ब्लॉक केलेले तिकीट वगळून) कमावले आहेत. कालच्या 15 लाखांच्या तुलनेत ही फारशी वाढ नाही. आता पर्यंत BMCM प्री-बुकिंग तिकीट विक्रीने निदान १ कोटीचा टप्पा त्तरी गाठायला हवा होता.
बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाच्या 17,000 तिकिटांची विक्री झाली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट येत्या दोन दिवसांत मोठी कमाई करेल की नाही हे येणारी वेळच सांगेल.
बडे मियाँ छोटे मियाँ 350 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला चित्रपट आहे सध्याचा ट्रेंड पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.