Sara Ali Khan: ‘ऐ वतन मेरे वतन’ मधील अभिनेत्री सारा अली खान म्हणाली- माझ विनोदी असण मूर्खपणा आहे का?

2 Min Read

Sara Ali Khan: सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सारा अली खानचा ‘ए वतन मेरे वतन’ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. साराचे चाहते तिला ‘ए वतन मेरे वतन’ मध्ये क्रांतिकारकाच्या रूपात पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. Ae Watan Mere Watan चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सारा अली खान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विनोदी स्वभावाबद्दल उघडपणे बोलताना दिसून आली.

सारा अली खान सोशल मीडियावर पापाराझींसोबत बोलताना अनेकदा तिच्या खोडकर विनोदी स्टाइलमध्ये दिसते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान सारा अली खान म्हणाली, ‘जे माझ्या जवळचे आहेत त्यांना माहित आहे की मी कधी गंभीर असते आणि कधी विनोद करत असते. मी अनेकदा सोशल मीडियावार लोकांसोबत हसून किंवा विनोद करून बोलत असते जर त्यामुळे त्यांना मी विदूषक आहे असे वाटत असल्यास त्याचा मला काही फरक पडत नाही.

हेही वाचा 👉 Kangana Ranaut: सद्गुरु जग्गी वासुदेव यांना हॉस्पिटलमध्ये पाहून कंगना राणावत झाली भावूक, म्हणाली- तुमच्याशिवाय….

मुलाखतीदरम्यान पुढे सारा म्हणाली, ‘मी चित्रपटसृष्टीत आहे आणी माझे काम चित्रपटांमध्ये काम करणे हे आहे. जर लोकांना माझे चित्रपटातील काम आवडले नाही तर मला त्रास होईल. पण जर मी एखाद्या अवॉर्ड नाईट मध्ये डान्स परफॉर्म केला किंवा असे कोणतेही काम केले त्यासाठी जर लोकांनी मला जज केले तर मात्र मला त्याचे वाईट वाटेल. आधी मि तसल्या बोलणाऱ्यां लोकांचा खूप विचार करायचे, विनोदी स्वभाव असणाऱ्या लोकांना स्वाभिमान नसतो का असे मला आधी वाटायचे. पण आता मी तसल्या बोलणाऱ्यांकडे लक्ष देणे बंद केले आहे.

पूर्वी प्रत्येकाला मी आवडावे असे मला वाटायचे आणी त्यासाठी मि तसे वागण्याचा प्रयत्न करायचो, परंतु काही काळानंतर मला समजले की मि फक्त स्वतःला आनंदी ठेवू शकते. जर सर्वाना चांगले वाटावे असे वागावे असा विचार केला तर त्यात फक्त माझी उर्जा वाया जाणार हे माझ्या लक्षात आले. लोक शहाणे आहेत, त्यांना सर्व गोष्टी माहित आहे आणि शेवटी फक्त आपले काम आपल्यासाठी बोलते. आणि बोलणाऱ्या लोकांना त्यांच्या जागी ठेवण्यावर मि विश्वास ठेवते. असे सारा म्हणाली.

नवीन 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा