Choli Ke Peeche : काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि तब्बू स्टारर चित्रपट क्रू (Crew) चा ट्रेलर प्रदर्शित झाला, क्रू चा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला. क्रू ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 24 तासांनी तो यूट्यूबवर ट्रेंड करत होता. आजच 20 मार्च रोजी क्रू चित्रपटातील नवीन गाणे चोली के पीचे रिलीज झाले आहे, गाण्यात बेबो म्हणजेच आपली करीना कपूर खान गुलाबी रंगाच्या साडीत धिंगाणा घालत आहे.
हेही वाचा 👉 बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफने घेतले पुण्यात आलिशान घर, किंमत ऐकूनच व्हाल थक्क.
क्रू या चित्रपटातील चोली के पीछे हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. क्रू चित्रपटाचे निर्माते व करीना कपूर यांनी सोशल मीडियावर चोली के पीछे गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणे पंजाबी गायक दिलजीत दोसांझने गायले आहे. चोली के पीछे हे गाणे 1993 मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या ‘खलनायक’ चित्रपटातील आहे. हे गाणे संजय दत्तच्या ‘खलनायक’ मध्ये प्रचंड गाजले होते.
क्रू हा चित्रपट राजेश कृष्णन यांनी दिग्दर्शित केला असून एकता आर कपूर, शोभा कपूर, अनिल कपूर आणि रिया कपूर यांनी क्रू ची निर्मिती केली आहे. क्रू 29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.