‘पुष्पा 2’ मधील दुसरे गाणे ‘अंगारों’ झाले रिलीज, येथे पाहा ते गाणे

2 Min Read
पुष्पा 2 'अंगारों गाणे
पुष्पा 2 'अंगारों गाणे, (Image Credit : एक्स- @iamRashmika)

Pushpa 2 Angaaron Song Released : राउडी अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटातील ‘अंगारों’ हे दुसरे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ‘अंगारों’ हे गाणे लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने गायले आहे. तर हे गाणे 6 भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी ‘पुष्पा 2’ चित्रपटातील ‘अंगारों’ हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अंगारों या गाण्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना दिसत होते. अंगारों गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह होता. ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी आज सकाळी 11.07 वाजता पुष्पा 2 मधील नवीन गाणे रिलीज केले आहे.

6 भाषांमध्ये बनवण्यात आले आहे हे गाणे

अल्लू अर्जुन च्या पुष्पा २ मधील ‘अंगारों’ हे गाणे 6 भाषांमध्ये बनवण्यात आले आहे. पुष्पा 2 मधील हे गाणे लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने गायले आहे. हे गाणे रिलीज होताच चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे. ‘पुष्पा २’च्या पहिल्या गाण्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. इंस्टाग्राम युजर्सनी त्या गाण्यावर खुपसाऱ्या रिल्स बनवल्या होत्या. त्याचप्रमाणे पुष्पा 2 मधील ‘अंगारों’ हे गाणे सुद्धा व्हायरल व्हायला जास्त वेळ लागणार नाही.

🔥 हेही वाचा 👉 🎵मिस्टर अँड मिसेस माही मधील हे नवीन गाणे रिलीज होताच व्हायरल🎵.

👉 कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड.

१५ ऑगस्टला प्रदर्शित होणार पुष्पा २ 

‘पुष्पा २’ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.  त्याचा पहिला भाग 2021 मध्ये रिलीज झाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. ‘पुष्पा २’ चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. अल्लू आणि रश्मिकाच्या चाहत्यांना दुसऱ्या भागातूनही जबरदस्त मनोरंजनाची अपेक्षा आहे. या चित्रपटातील फहाद फाजीलची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा कॅमिओ दिसणार आहे. 

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल