‘रोया जब तू’ गाणे रिलीज होताच व्हायरल, 24 तासात पाहिले ‘इतक्या’ लाख लोकांनी

2 Min Read
Mr and Mrs Mahi Roya Jab Tu Song
Mr and Mrs Mahi Roya Jab Tu Song (Image Credit : dharmamovies)

Mr and Mrs Mahi Roya Jab Tu Song : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव सध्या त्यांच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे एक नवीन गाणे ‘रोया जब तू’ रिलीज झाले आहे, ‘रोया जब तू’ गाणे लोकांना खूप आवडले आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चित्रपटाचे निर्माते चित्रपटातील गाणी रिलीज करून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. नुकतेच ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन गाणे ‘रोया जब तू’ रिलीज केले आहे. ‘रोया जब तू’ हे एक इमोशनल गाणे आहे. 

‘रोया जब तू’ गाणे रिलीज होताच 24 तासात पाहिले 15 लाख लोकांनी 

‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधील ‘रोया जब तू’ या गाण्यात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांच्यातील भावनिक क्षण दाखवण्यात आले आहेत. गायक विशाल मिश्रा याने या गाण्याला आवाज दिला असून त्यांनी संगीतही दिले आहे. तर, गाण्याचे बोल विशाल आणि अझीम दयानी यांनी लिहिले आहेत. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधील हे गाणे लोकांना खूप आवडल्याचे दिसत आहे. हे गाणे रिलीज होऊन 24 तास झाले असून आतापर्यंत या गाण्याला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत.

🔥 हेही वाचा 👉  मिस्टर अँड मिसेस माही चा पहिला रिव्ह्यू येथे वाचा.

Mr and Mrs Mahi Roya Jab Tu Song

या दिवशी रिलीज होणार ‘मिस्टर अँड मिसेस माही’

‘मिस्टर अँड मिसेस माही’ 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.  या चित्रपटापूर्वी जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांची जोडी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रुही अफजान’मध्ये दिसली होती. बॉलीवूड सेलिब्रिटी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपरबद्दलच त्यांचं मत व्यक्त करत आहेत, नुकेतच अभिनेत्री नेहा धुपिया, सोहा आली खान, कुणाल खेमू यांनी चित्रपरबद्दलचे त्यांचे अभिप्राय व्यक्त केले आहेत.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल