Kareena Kapoor : करीना कपूर खान (Kareena Kapoor) तिचे चाहते बऱ्याच दिवसांपासून तिच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. अशातच आता बेबोच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर बॉलिवूडनंतर आता करीना कपूर लवकरच साऊथ इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. खुद्द करीना कपूरने नुकतीच ही माहिती दिली आहे.
करीना कपूर खान सध्या तिच्या आगामी ‘क्रू’ (Crew) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज 16 मार्च रोजी ‘क्रू’ या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. आता करीनाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करिनाने अलीकडेच ती कन्नड सिनेमात पदार्पण करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले होते.
व्हिडीओ पहिला का 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.
करीना कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने चित्रपटाचे नाव जाहीर केले नाही, परंतु असे बोलले जात आहे की करीना कपूर साऊथ सुपरस्टार यशसोबत दिसणार आहे.
करीना व्हिडीओमध्ये संवादादरम्यान तिच्या आगामी चित्रपटाबद्दल इशारा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करीना मी खूप मोठा साऊथ चित्रपट करू शकते असे म्हणते, जरी शूटिंग कधी सुरु करणार आहे हे मला माहित नाही, परंतु मी उत्सुक आहे की माझ्या चाहत्यांना हे समजेल की मी ते करणार आहे. हे मी हे पहिल्यांदाच करणार आहे. असे ती म्हणते.
साऊथ सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही किंवा करिनाने या व्हिडिओमध्ये ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे नाव उघड केले नाही.
करीना कपूर आपल्याला लवकरच क्रू मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेननही दिसणार आहेत. क्रू हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर करीना सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे.
हेही वाचा 👉 Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, शेअर केला मुलाचा फोटो.
👉 बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफने घेतले पुण्यात आलिशान घर, किंमत ऐकूनच व्हाल थक्क.