Sidhu Moosewala : दिवंगत पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवालाचे चाहते त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनंतरही त्याला विसरलेले नाहीत आणी कधी विसरणार देखील नाहीत, सिद्धू मूसेवालाच्या निधनाने संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर प्रेगनंट असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांना झालेल्या मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करून त्यांना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे चाहते आजही त्यांची आठवण काढतात. त्याच्या गाण्यांमधून सतत त्याची आठवण होते. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गरोदर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. आता त्यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.
सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह पुन्हा एकदा वडील झाले आहेत. आपल्या नवजात मुलासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांना एक मुलगा झाल्याची माहिती त्यांनी आज दिली.