Emraan Hashmi Birthday Video : बॅड बॉय अशी ख्याती असणारा बॉलीवूड सुपरस्टार इम्रान हाश्मी याचा आज वाढदिवस आहे. आज इम्रान हाश्मी 45 वर्षांचा झाला. अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतानादेखील इम्रानने आपला वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा करण्यासाठी वेळ काढला. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आज इम्रान हाश्मीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सगळ्याच सोशल मीडियावर दिसत आहेत. इम्रान हाश्मीचा फिटनेस पाहता तो ४५ वर्षांचा आहे असे वाटत नाही. इम्रानने चाहत्यांसोबत केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला.
हेही वाचा 👉 Jannat 3: ‘जन्नत 3’ रिलीज बद्दल इमरान हाशमीने केला खुलासा, हा चित्रपट माझ्यासाठी नई बोतल में पुरानी शराब.
👉 सुनील शेट्टी आण्णा माधुरी बरोबर होळीची पार्टी करून लोड आहे काय? VIDEO व्हायरल.
यावेळी त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी घराबाहेर जमली होती. इम्रानचे अनेक चाहते त्याच्यासाठी केक घेऊन आले होते. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते, चाहत्यांचे त्याच्यावरचे प्रेम पाहून इम्रान खूपच आनंदी होता. इम्रानने आपला वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत साध्या पद्धतीने साजरा केला.
पाहायला विसरू नका 👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.
आज इम्रान हाश्मीच्या वाढदिवसानिमित्त OG या आगामी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
संपूर्ण बातमी वाचा 👉 इम्रान हाश्मीन वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिल सरप्राईज, साऊथ डेब्यू फिल्म ‘ओजी’चा फर्स्ट लूक रिलीज.