Deepika Padukone Deewani Mastani : दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी तसेच भारतीय फिल्म इंडस्ट्रीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. दीपिका पदुकोणच्या बाजीराव मस्तानीमधील दिवानी-मस्तानी या गाण्याला ऑस्करने त्यांच्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवर स्थान दिले आहे.
(Oscar Insta Page) हे ऑस्करचे अधिकृत इंस्टाग्राम पेज आहे. ऑस्कर इंस्टा पेजचे 3 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या बाजीराव मस्तानी मधील ‘दिवानी-मस्तानी’ हे गाणे श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिने गायले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हे प्रमुख्य भूमिकेत होते.
हा व्हिडीओ व्हायरल होताच दीपिका पदुकोणच्या तसेच भारतीय चित्रपट चाहत्यांनी हिंदी सिनेमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल ऑस्करचे आभार मानले आहेत. दीपिका पदुकोणचा पती रणवीर सिंग यानेदेखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली आहे. रणवीर सिंगने लिहिले आहे :मंत्रमुग्ध.
ट्रेंडिंग 👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.
दीपिका पदुकोणला ऑस्करने दिलेला हा सन्मान खूप खास आहे.
सध्या व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.