Aditi Rao Hydari: फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक अभिनेत्रींची गुपचूप लग्ने होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही काळापासून आदितीचे नाव प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थसोबत जोडले जात आहे. दरम्यान, तापसी पन्नूनंतर आता या जोडप्याने गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आलो आहे.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे झाले लग्न
सध्या व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबत सात फेरे घेतले आहेत. वृत्तानुसार, तेलंगणातील रंगनाथ स्वामी मंदिरात दोघांनी एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले. या दोघांनी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यांच्या उपस्थितित लग्न केले.
आतापर्यंत या दोघांकडून लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही किंवा लग्नाचे कोणतेही फोटोही त्यांनी अद्याप शेयर केलेले नाहीत.
हेही वाचा 👉 टायटॅनिकमध्ये रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाचे 5 कोटी, तर केट विन्सलेटने परिधान केलेला ड्रेस विकला गेला ‘इतक्या’ किमतीला.