Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्वामुळे ओळखली जाते. ती स्पष्टपने स्वतःचे मत मांडते, परंतु अलीकडेच कंगना राणावत भावूक झालेली दिसली. आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर नुकतीच मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कंगना राणावत त्यांच्यासाठी खूपच काळजीत असल्याचे दिसून आले.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांना बऱ्याच काळापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यांच्यावर १७ मार्च रोजी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली. कंगना राणावतने तिच्या सोशल मीडिया हँडल आणि इन्स्टाग्रामवर सद्गुरूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याचबरोबर एक भावनिक पोस्टही केली आहे, पोस्टमध्ये तिने लिहलय “लवकर बरे व्हा, तुमच्याशिवाय आम्ही काही नाही”.
हेही वाचा 👉 VIDEO: रानू मंडलने नववधूच्या रुपात गायल गाण, चाहता म्हणाला कांचना परत आली आहे का?.
यानंतर कंगनाने आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, आज जेव्हा मी सद्गुरुंना आयसीयू बेडवर पडलेले पाहिले, तेव्हा मला अचानक त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली, याआधी मला असे कधीच वाटले नव्हते की ते आपल्यासारखेच आहेत.
सद्गुरू जग्गी वासुदेव यांना बऱ्याच काळापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यांच्यावर १७ मार्च रोजी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
नवीन गाणे रिलीज 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.
👉 Sara Ali Khan: ‘ऐ वतन मेरे वतन’ मधील अभिनेत्री सारा अली खान म्हणाली- माझ विनोदी असण मूर्खपणा आहे का?.