Ranu Mondal News : एका व्हायरल व्हिडीओमुळे एका रात्रीत स्टार बनलेली राणू मंडल तुम्हाला आठवत असेलच. तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळेच हिमेश रेशमियासारख्या कलाकारांनीही तिला गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू मंडल लाइमलाइटमधून अशा प्रकारे गायब झाली की लोक तिला विसरून गेले.
नवीन 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.
पण आता पुन्हा एकदा रानू मंडल चर्चेचा विषय बनली आहे. ते तिच्या नवीन गाण्यामुळे, आता रानू मंडलचे आणखी एक नवीन गाणे व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती नववधूसारखी वेशभूषा करून वेगळ्या अंदाजात गाणे गाताना दिसत आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळीच आहे. यावेळी रानू मंडलच्या नवीन गाण्याला चाहत्यांकडून दादतर मिळालीच नाही त्याउलट चाहते तिच्यावर नाराज आहेत. एका यूजरने तर गंमतीत विचारले की कांचना परत आली आहे का? याआधी एकदा रानू मंडलचा ओव्हर मेकअप लूक व्हायरल झाला होता. पण नंतर तो व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @rabi.pal.7773631 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.