बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

3 Min Read
Bade Miyan Chote Miyan Ott Release Marathi News
Bade Miyan Chote Miyan Ott Release Marathi News, (फोटो: IMDb)

Bade Miyan Chote Miyan OTT : आज ईद च्या शुभ मुहूर्तावर बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यासोबतच बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटी प्लॅटफॉर्म बाबतची माहिती देखील समोर आली आहे. बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटी अधिकार कोणत्या प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत समजले का?

बडे मियाँ छोटे मियाँ ओटीटी प्लॅटफॉर्म: बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट आज (११ एप्रिल) रमजानच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला आहे. आणी  आजच बडे मिया छोटे मिया चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर येणार याबद्दची महिती समोर आली आहे.

🔥 सध्या व्हायरल 👉 Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार, दुचाकीवरून आले होते दोन हल्लेखोर, गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल.

बडे मियाँ छोटे मियाँ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म

बडे मिया छोटे मिया चित्रपटाचे स्ट्रीमिंग अधिकार नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. थिएटर रननंतर आपल्याला बडे मिया छोटे मिया चित्रपट नेटफ्लिक्स ओटीटीवर पाहता येईल. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 8 आठवड्यांत OTT वर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

बडे मिया छोटे मिया या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे बजेट सुमारे 350 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात ॲक्शन सिन्स आणि गाण्यांसाठी मोठा खर्च करण्यात आला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कधी-कधी एका दिवसाला ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिका देशमुख, अली अब्बास जफर, हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एन्टरटेन्मेंट्स आणि एएझेड फिल्म्सच्या बॅनरखाली बडे मिया छोटे मियाची निर्मिती केली आहे.

बडे मिया छोटे मिया चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त ॲक्शन ने भरलेला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोबत, मल्याळम स्टार अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, टेम्पल एफ, सोनाक्षी सिन्हा, रोनित बोस रॉय, मनीष चौधरी, साहब अली आणि पवन चोप्रा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.  

अजय देवगण चा ‘मैदान’ हा चित्रपट देखील आज (11 एप्रिल) रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. भारताचे महान फुटबॉल प्रशिक्षक हैदराबादी सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात प्रियामणीचीही प्रमुख भूमिका आहे.

बडे मिया छोटे मिया ट्रेलर 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज: अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये, बघितला का BMCM Trailer.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा