बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज: अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये, बघितला का BMCM Trailer

2 Min Read
Bade Miyan Chote Miyan Trailer Release
बड़े मियां छोटे मियां ट्रेलर - फोटो : सोशल मीडिया

Bade Miyan Chote Miyan Trailer : अक्षय-टायगर यांचा बडे मियाँ छोटे मियाँचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यानंतर बडे मियाँच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि छोटे मियाँच्या भूमिकेत टायगर श्रॉफ एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाच्या टीझरमध्ये दोघांची जोडीची पाहायला मिळाली होती आणी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाचे नाव अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या जून्या चित्रपटावरून घेतले गेले असले तरी नवीन बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाची कथा पूर्णपणे नवीन आहे.

बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज

आज 26 मार्च रोजी निर्मात्यांनी बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दोघेही आपला जीव धोक्यात घालून देश वाचवण्यासाठी लढताना दिसत आहेत.

सध्या ट्रेंडिंग 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लर यांच्यासह पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

👉 बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये टायगर श्रॉफला पाहण्यासाठी खूपच उत्सुक – दिशा पटानी.

बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel
Share This Article