बडे मियाँ छोटे मियाँ मध्ये टायगर श्रॉफला पाहण्यासाठी खूपच उत्सुक – दिशा पटानी

2 Min Read
Bade Miyan Chote Miyan Trailer Reaction Disha Patani
Bade Miyan Chote Miyan Trailer Reaction Disha Patani

Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चा ट्रेलर आज 26 मार्च रोजी लाँच झाला आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा एक ॲक्शन ने भरलेला चित्रपट आहे, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ट्रेलर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. सोशल मीडियावर टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.  याशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्सच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी हिने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तिच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या कथेबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे.  तिने ट्रेलरच्या लिंकसह चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत तिने लिहिलय कि, ‘तुम्हाला स्क्रीनवर धमाका करताना पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे’. दिशा पटानी हा चित्रपट पाहण्यास खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बडे मियाँ छोटे मियाँ १० एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार

अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट हा चित्रपट पुढच्या महिन्यात १० एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि रोनित रॉय हे देखील दिसणार आहेत.

सध्या ट्रेंडिंग 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

👉 बडे मियाँ छोटे मियाँ ट्रेलर रिलीज: अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन मोड मध्ये, बघितला का BMCM Trailer.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel
Share This Article