Shaitaan Box Office Day 26: ‘क्रू’ मुळे शैतान ला लागला दम, बॉक्स ऑफिसवर रोज करोडोंमध्ये कमाई करणारा ‘शैतान’ आता करतोय फक्त लाखांचीच कमाई

2 Min Read
Shaitaan Box Office Day 26 Earnings Dip
Shaitaan Box Office Day 26 Earnings Dip

Shaitaan Box Office Collection Day 26 : शैतानने बॉक्स ऑफिसवर बरेच दिवस चांगली कमाई केली पण आता परिस्थिती बदलली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रू चित्रपटामुळे शैतान चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोठा परिणाम झाला आहे.  करीना कपूर क्रिती सॅनॉन आणि तब्बू प्रमुख भूमिकेत असलेल्या क्रूने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे आणि त्याचा शैतानला मोठा फटका बसला आहे.

‘शैतान’मध्ये अजय देवगणसोबत आर माधवन आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. ‘शैतान’ चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. तर, जिओ स्टुडिओ, देवगण फिल्म्स आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी ‘शैतान’ची निर्मिती केली आहे. ‘शैतान’ हा कृष्णदेव याज्ञिक लिखित आणि दिग्दर्शित 2023 मध्ये आलेल्या वाश या गुजराती चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

अजय देवगणचा हाहाकार माजवणारा ‘शैतान’ चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर शांत होत चालला आहे. ‘शैतान’ प्रदर्शित झालेल्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत होता, मात्र आता करीना कपूर, क्रिती सॅनॉन आणि तब्बू स्टारर ‘क्रू’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ‘शैतान’ ला दम लागला आहे. सध्या परिस्थिती अशी झाली आहे की, बॉक्स ऑफिसवर रोज करोडोंमध्ये कमाई करणारा ‘शैतान’ आता रोज फक्त लाखांचीच कमाई करत आहे.

हेही वाचा 👉 Crew Box Office Day 5: ‘क्रू’ च्या कमाईत मंगळवारी झाली मोठी घट.

‘शैतान’ बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन चार आठवडे पूर्ण होत आहेत. चित्रपटाच्या बिझनेस रिपोर्टबद्दल सांगायचे तर, ‘शैतान’ने पहिल्या आठवड्यात जवळपास 80 कोटींची कमाई केली होती. तेच, दुसऱ्या आठवड्यात 34.55 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 19.85 कोटींचा व्यवसाय केला.

‘शैतान’च्या चौथ्या आठवड्यातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर चौथ्या आठवड्यात चित्रपटाने निराशा केली आहे. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ ने शुक्रवार, 29 मार्च रोजी 1.25 कोटींची कमाई केली आहे. तेच, शनिवारी ‘शैतान’चे कलेक्शन 1.60 कोटी आणि रविवारी 1.75 कोटी होते. इथपर्यंत ठीक होते. मात्र चित्रपटाला खरा धक्का सोमवारी बसला.

शैतान ची मंगळवारी किती कोटींची कमाई झाली

‘शैतान’ने चौथ्या सोमवारी बॉक्स ऑफिसवर फक्त 60 लाखांची कमाई केली. आणी मंगळवारीतर चित्रपटाने केवळ 55 लाखांची कमाई केली. यासह ‘शैतान’ने रिलीजच्या 26 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 139.90 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel
Share This Article