Crew Box Office Day 5: ‘क्रू’ च्या कमाईत मंगळवारी झाली मोठी घट

2 Min Read
Crew Box Office Day 5 Earnings Dip
Crew Box Office Day 5 Earnings Dip

बडे मियाँ छोटे मियाँ रिलीज होण्यापूर्वीच मंगळवारी ‘क्रू’ च्या कमाईत झाली घट

Crew Box Office Day 5 : करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांचा ‘क्रू’ बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे. तिन्ही अभिनेत्रींचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून क्रू पाहण्यासाठी चित्रपटगृहे हाऊसफुल्ल होत आहेत. ‘क्रू’ ने बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईने सुरुवात केली होती, परंतु मंगळवारी चित्रपटाची कमाई थोडीशी घसरली.

बॉक्स ऑफिसवर ‘क्रू’साठी येणारा काळ थोडा कठीण जाणार आहे, कारण ईदला अक्षय कुमारचा बडे मियाँ छोटे मियाँ आणि अजय देवगणचा मैदान हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होनार आहेत. या दोनीही चित्रपटांमुळे ‘क्रू’ च्या कामाइवर परिणाम होईल.

करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्या ‘क्रू’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पहिल्या दिवशी ‘क्रू’ने 9.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. तेच, दुसऱ्या दिवशी 9.75 कोटींचा व्यवसाय केला होता, तर रविवारी चित्रपटाने 10 कोटींचा व्यवसाय केला. आणी, ‘क्रू’ने ओपनिंग वीकेंडला जवळपास 30 कोटी रुपयांची मोठी कमाई केली.

सोमवारी ‘क्रू’ने 4.20 कोटींची कमाई केली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी क्रू च्या कमाईत घट झाली आहे. सैकनिल्कच्या प्राथमिक माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी चित्रपटाने 2.76 कोटींची कमाई केली आहे. यासह, ‘क्रू’ ने रिलीजच्या पाच दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 36.46 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

हेही वाचा 👉 Shaitaan Box Office Day 26: ‘क्रू’ मुळे शैतान ला लागला दम, बॉक्स ऑफिसवर रोज करोडोंमध्ये कमाई करणारा ‘शैतान’ आता करतोय फक्त लाखांचीच कमाई.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई