मुलीचा डान्स व्हायरल व्हिडिओ : सोशल मीडियावर करमणूकीसाठी आपल्याला दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळत असते. YouTube, Instagram हे लोकांसाठी मनोरंजनाचे साधन आहे तर काही लोकांसाठी ते त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याचे एक व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा पार करत असल्याचे दिसते. भारतात TikTok बंद झाल्यापासून टिकटॉक चे सर्व प्रेक्षक Instagram वर स्थलांतरित झाले आहेत. Insta वर व्हिडीओ चालले तर कमाई आणि प्रसिद्धी दोन्ही मिळते त्यामुळेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक मजेशीर व्हिडीओ बनवून ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर करत असतात.
आज आम्ही तुम्हाला Instagram वरील एका मुलीचा व्हिडिओ दाखवणार आहोत. या मुलीला डान्सची आवड असून सध्या तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो खूप पाहिला जात आहे. या व्हिडिओत मुलगी रस्त्यात माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करत आहे.
मुलीने रस्त्यावर केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स
व्हिडीओ मदे एक मुलगी माधुरी दीक्षितच्या ‘आजा नच ले’ चित्रपटाच्या टायटल सॉंगवर डान्स करत आहे. ती मुलगी रस्त्यावर उभी आहे आणि माधुरी दीक्षितच्या ‘आजा नच ले’ गाण्यावर डान्स करत आहे. ग्रे रेड गाऊन सूटमध्ये मुलगी डान्स ऑडिशन सुरू असल्यासारखे एक्स्प्रेशन्स देत नाचताना दिसत आहे. या मुलीचा डान्स व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक या मुलीच्या डान्सचे कौतुक करत आहेत.
🔥सध्या व्हायरल 👉 Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार, दुचाकीवरून आले होते दोन हल्लेखोर, गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल.