Pushpa 2 Teaser : पुष्पा 2 या चित्रपटाची अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) जगभरातील चाहते वाट पाहत आहेत. पुष्पा 2 हा एक मोस्ट अवेटेड चित्रपट मानला जात आहे. मूळच्या साऊथच्या असणाऱ्या पुष्पा चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे पुष्पा 2 बद्दल केवळ तेलुगू प्रेक्षकांमध्येच नाही तर हिंदी चित्रपट चाहत्यांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता आहे.
अल्लू अर्जुनने आज 8 एप्रिल रोजी त्याच्या वाढदिवसा दिवशी X वर पुष्पा 2 टीझर शेअर केला आणि लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुम्हा प्रत्येकाचे आभार मानतो! माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे.
सध्या व्हायरल 👉 Pushpa 2: The Rule मध्ये David Warner नक्की असणार का? जाणून घ्या.
पण काही लोक असा आरोप करत आहेत की सोशल मीडियावर पुष्पा 2 चे प्रमोशन करून चित्रपटाबद्दल फक्त हाईप निर्माण केली जात आहे.
24 तासात कळेल कि पुष्पा 2 टीझरची फक्त प्रमोशन करून हाईप निर्माण केली गेली होती कि खरच लोक पुष्पा 2 च्या टीझरची आतुरतेने वाट पाहत होते.
पहिल्या 24 तासांमध्ये YouTube वर भारतातील सर्वाधिक पाहिले गेलेले टीझर
1. सालार भाग 1 – 116.5 दशलक्ष व्हि्यूज.
2. KGF 2 – 106.5 दशलक्ष व्हि्यूज.
3. आदिपुरुष – 74 दशलक्ष व्हि्यूज
4. राधे श्याम – 57.5 दशलक्ष व्हि्यूज.
5. जवान – 55 दशलक्ष व्हि्यूज.
आता 24 तासानी, YouTube व्हि्यूज आणि कमेंट्सवरून, आपल्याला पुष्पा 2 टीझरची खरी हकीकत समजेल. खरच चाहते उत्सुक असतील तर पुष्पा 2 टीझर या टॉप 5 लिस्ट मध्ये स्थान मिळवेल. नाहीतर प्रमोशन करून निर्माण केलेली नुसती हाईप.
लेटेस्ट 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.