Kalki 2898 AD Release Date : प्रभास-दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना आता ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटासाठी जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. सोशल मीडियावर एक पोस्ट करून ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांसारखे दिग्गज स्टार्स एकत्र दिसणार आहेत. या सुपरस्टार्सना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता पण त्याची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.
‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या रिलीजची तारीख : तामिळ चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटाच्या पोस्टरसोबतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही नमूद करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता ‘कल्की 2898 एडी’ १२ जुलै २०२४ रोजी रिलीज होणार आहे.
🔥 ट्रेंडिंग 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने 175 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.