Yodha Day 1 Box Office: योद्धाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; बस्तर-द नक्सल स्टोरी सोबत कडवी टक्कर

2 Min Read
Yodha picture pahilya divashichi box office varil kamai janun ghya

Yodha Box Office Collection Day 1 : सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा चित्रपट रिलीज होण्याची प्रेक्षक अनेक दिवसांपासून खूप आतुरतेने वाट पाहत होते. पण अखेर ती प्रतीक्षा आज संपली, सिद्धार्थ मल्होत्राचा योद्धा हा चित्रपट आज म्हणजेच १५ मार्चपासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी योद्धाने बॉक्स ऑफिसवर काय कमाल केलीयाची माहिती समोर आली आहे.

Yodha Day 1 Collection : दिग्दर्शक पुष्कर झा आणि सागर आंब्रे दिग्दर्शित योद्धा आज म्हणजेच १५ मार्चपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवसांपासून चाहते योद्धा या चित्रपटाची वाट पाहत होते. योद्धा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीत उतरतोय कि नाही याचा अंदाज आपण योद्धा चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून लावू शकता.

योद्धाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

योद्धा या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा सोबत दिशा पटानी आणि राशी खन्ना या अभिनेत्रीही मुख्य भूमिकेत आहेत. निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली योद्धाची निर्मिती झाली आहे. योद्धाच्या रिलीजपूर्वी असे वाटत होते कि योद्धा बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत पहिल्या दिवशी खूप मोठे कलेकशन करेल. आता योद्धा डे 1 बॉक्स ऑफिस कलेक्शन ची आकडेवारी देखील समोर आली आहे.

योद्धाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती सैकनिल्क कडून दिली गेली आहे. त्यानुसार, सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाने पहिल्या दिवशी 4 कोटींची कमाई केली आहे. एक व्हिलन हा सिद्धार्थ मल्होत्राचा सर्वाधिक ओपनिंग कलेकशन करणारा सिनेमा आहे, एक व्हिलन चित्रपटाने 16.72 कोटी चे ओपनिंग केले होते.

सिद्धार्थ मल्होत्राचा चित्रपट योद्धा सोबतच अदा शर्माचा चित्रपट बस्तर-द नक्सल स्टोरी हा देखील आज १५ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर योद्धा व बस्तर-द नक्सल स्टोरी या दोन चित्रपटांमध्ये कडवी टक्कर सुरु आहे. बस्तर चित्रपटानेदेखील रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगली कमाई केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा 👉 बडे मियाँ छोटे मियाँ मधील अभिनेता टायगर श्रॉफने घेतले पुण्यात आलिशान घर, किंमत ऐकूनच व्हाल थक्क.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा