SDGM मध्ये 66 वर्षाच्या सनी देओल ची असणार ही 31 वर्षांची अभिनेत्री, केलाय मराठी चित्रपट

2 Min Read
Sunny Deol Actress in SDGM Saiyami Kher
Sunny Deol Actress in SDGM Saiyami Kher

Sunny Deol Actress in SDGM : सनी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे.  गदर 2 च्या घवघवीत यशानंतर त्याला अनेक मोठे सिनेमे मिळत आहेत. जाणून घ्या 66 वर्षीय सनी देओलच्या एसडीजीएम या ॲक्शन सिनेमात कोण आहे सनी देओलची हिरोईन.

SDGM मध्ये सनी देओल ची अभिनेत्री : गदर 2 च्या तुफान यशानंतर सनी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट घेऊन परतला आहे. सध्या सनी देओलच्या लाहोर 1947 या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्याचबरोबर बॉर्डर 2 ची घोषणा झाली आहे. आणि नुकतेच ‘पुष्पा’ च्या निर्मात्याने सनी देओलसोबतचा त्याचा पुढचा चित्रपट SDGM ची घोषणा केली आहे. सनी देओलने या चित्रपटाला देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट असल्याचे म्हटले आहे. गदर 2 च्या यशानंतर सनी देओल बॉलिवूड मधील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेता बनला आहे. आता त्याने वयाच्या 66 व्या वर्षी ॲक्शन अभिनेता म्हणून दमदार पुनरागमन केले आहे. SDGM चित्रपटाच्या नायिकेचीही घोषणा करण्यात आली  आहे. (Saiyami Kher) सैयामी खेर SDGM चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार आहे.

सनी देओल SDGM अभिनेत्री सैयामी खेर फोटो
सैयामी खेर फोटो (Image Source: instagram.com/saiyami)

सनी देओलची ॲक्शन फिल्म SDGM ची अभिनेत्री सैयामी खेर हिने या चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘SDGM चा भाग बनून मी खूप खुश आहे. भारतीय सिनेसृष्टीतील आयकॉन सनी देओलसोबत काम करणे हा एक अतुलनीय सन्मान आहे आणि यामुळे माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. घूमरनंतर ही संधी माझ्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरेल. गोपीचंद मालिनेनी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला इतक्या मोठ्या चित्रपटात माझी कला दाखवण्याची संधी दिल्याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे.

🔴 ट्रेंडिंग 👉 आठ अब्ज सोळा कोटी रुपये असणाऱ्या दीपिका पदुकोणला ‘या’ अभिनेत्रीने टाकले मागे.

Sunny Deol SDGM Actress Photo
Saiyami Kher Image (instagram.com/saiyami)

अभिनेत्री सैयामी खेर हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या माऊली चित्रपटात काम केल आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस