शैतान 2 : सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट असणाऱ्या शैतानने त्याच्या नावीन्यपूर्ण कथेच्या जोरावर मोठे यश मिळवले. अजय देवगण आणि आर माधवनच्या शैतान चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही धडाका लावला आहे. शैतान बॉक्स ऑफिस कलेक्शन वर नजर टाकली तर शैतान हा चित्रपट येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींच्या पुढे कमाई करेल.
अजय देवगण आणि आर माधवन यांच्या शैतान या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडलाय. त्यामुळे शैतान 2 चित्रपटाबाबतच्या चर्चाना उधान आले आहे. अशातच शैतान पार्ट 2 बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. असे बोलले जात आहे कि निर्माते लवकरच शैतान 2 चित्रपटाबाबत घोषणा करू शकतात.
अजय देवगणच्या शैतान 2 ची लवकरच घोषणा
तुम्ही जर शैतान हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आल असेलच कि शैतान 1 मध्ये आर माधवन अजून जिवंत आहे. अजय देवगणने आर माधवनच्या जाळ्यातून मुलींना वाचवले पण आर माधवनला एका बंद खोलीत डांबून ठेवल आहे. म्हणजेच निर्मात्यांनी शैतान चित्रपटाचा शेवट केला नाही.
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, दिग्दर्शक विकास बहल यांना शैतान 2 चित्रपटाची कथा मिळाली आहे आणि आता लवकरच ते शैतान 2 चित्रपटाची घोषणा करू शकतात.
सध्या ट्रेंडिंग 👉 कंगना राणावत का काढतेय सनी लिओनीची इज्जत, सनी लिओनीलाच विचारा.
.👉 ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाबद्दलच्या या बातमीने सलमान खानच्या चाहत्यांची उत्कंठा अजूनच वाढली
शैतान 2 मध्ये एखाद्या कुटुंबावर आधारित कथा दाखवली जाणार नसून त्यात महाराष्ट्रातील कोंकण भागातील कथा दाखवली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोंकण हे अशा क्रियाकलापांसाठी प्रसिद्ध मानले जाते. शैतान 2 चे शूटिंगही कोकणात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा 👉 तापसी पन्नूनंतर आता या अभिनेत्रीने रंग दे बसंती मधल्या अभिनेत्यासोबत दुसऱ्यांदा गुपचूप केले लग्न.
शैतान 2 च्या स्टार कास्ट बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेलो नाही.