Alia Bhatt Met Gala Saree : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मेट गाला 2024 मध्ये भारतीय डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. आलियाने तिचा मेट गाला लूक सोशल मीडियावर शेयर केला आहे. यामध्ये ती पॅलेट कलरची साडी परिधान केल्याचे दिसत आहे.
आलियाने तीच्या साडीलुक च्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे, वेळ आणि मेहनत घेऊन तयार केलेल्या गोष्टी नेहमीच योग्य असतात. साडी हे आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. सब्यसाची मुखर्जी यांच्या मदतीने या व्हिजनला नवा आकार मिळाला आहे. आलिया पुढे म्हणाली, आम्ही विशेषत: हस्तकलेवर भर दिला आहे, ज्यामध्ये हाताने भरतकाम, मौल्यवान रत्ने तसेच मण्यांची कामे आणि सुंदर काठाची डिझाईन यांचा समावेश आहे. साडीचा पॅलेट रंग निवडण्याचे कारण म्हणजे, पॅलेट रंग पृथ्वी, आकाश आणि समुद्राचे निसर्ग सौंदर्य प्रतिबिंबित करतो.
आलियाने सांगितले की तिने केस आणि मेकअपसाठी विंटेज शैली निवडली, ज्यामध्ये उच्च हेअरस्टाईल आणि सॉफ्ट फ्रेकल यांचा समावेश आहे. आलियाची मेट गाला मधली साडी तयार करणे खूप मजेशीर आणि तितकेच तणावपूर्ण काम होते. ही साडी बनवण्यामागे 163 लोकांची मेहनत आहे. यामध्ये कारागीर, भरतकाम करणारे, कलाकार इत्यादींचा समावेश आहे. सर्वांनी मिळून १९६५ तासांत आलियाची साडी तयार बनवली.
यानंतर आलियाने तिच्या लूकबद्दल तिच्या टीमचे आभार मानले. अपार प्रेम आणि परिश्रमाने बनवलेली ही सुंदर साडी सादर करताना मी अत्यंत कृतज्ञ आहे. अनैता श्रॉफ अदजानिया, लक्ष्मी लहर, पुनित सैनी, अमित ठाकूर, डॉली जैन आणि मेरी यांच्या टीमचे आलीने आभार मानले.