Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला मिळाला एक बिग बजेट चित्रपट, ‘या’ मोठ्या दिग्दर्शकाच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक

2 Min Read
Kartik Aaryan to Star in Mega Budget Action Thriller Directed by Vishal Bharadwaj
कार्तिक आर्यनला नवीन चित्रपट मिळाला आहे

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन याने फिल्म इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्तिक हा इंडस्ट्रीतील नामवंत कलाकारांपैकी एक आहे. कार्तिकने अनेक चित्रपटांद्वारे स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. 

Kartik Aaryan New Movie: येत्या काळातही आपल्याला कार्तिक अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कार्तिकने ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स, थ्रिलर यासह जवळपास प्रत्येक शैलीतील चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत. ‘भूल भुलैया 2’ च्या यशाने कार्तिककडे अनेक चित्रपट चालून येत आहेत त्यात आता आणखी एका चित्रपटाच्या नावाची भर पडली आहे. नुकत्याच आलेल्या एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्याला कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ॲक्शन करताना दिसणार आहे. साजिद नाडियादवाला यांच्या पुढील चित्रपटात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. ॲक्शन थ्रिलरसोबतच आपल्याला या चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा 👉 चष्मेश अंकल एक केला दो ना, झाली 26 वर्षांची सोशल मीडियावर फोटो व्हायरल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनला घेऊन साजिद नाडियादवाला एक मेगा बजेट ॲक्शन थ्रिलर चित्रपटावर काम सुरु करणार आहे, ज्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहेत. हा चित्रपट विशाल भारद्वाज यांच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी सुरू होणार असून पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याची चर्चा आहे.

सध्या कार्तिक ‘भूल भुलैया 2’ च्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘भूल भुलैया 3’ च्या शूटिंगनंतर कार्तिक विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. याशिवाय कार्तिक भूषण कुमारसोबत ‘पति पत्नी और वो 2’ चित्रपट करणार असल्याचीही चर्चा आहे, ज्याचे शूटिंग याच वर्षात सुरू होणार आहे.

👉 Jawan: शाहरुख खानच्या ‘जवान’ चा दुसरा भाग बनणार? ॲटलीने केला खुलासा.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा