Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपकडून उमेदवारी मिळणार हे जेव्हापासून जाहीर झालाय तेव्हापासून कंगना राणावत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना राणावत तिच्या फिल्मी करिअरबद्दल मोकळेपणाने बोलली. कंगनाला विचारण्यात आले की ती राजकारणात का आली, तिचे चित्रपट फ्लॉप झाले म्हणून? कंगनाने यामागचे कारण सांगितले.
काही दिवसांपूर्वी भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठीची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका सकारून घराघरांत पोहोचलेले अरुण गोविल आणी कंगना राणावतच नाव होतं. अरुण यांना मेरठ येथील तिकीट तर कंगनाला तिच जन्मस्थळ मंडी येथील तिकीट मिळाल आहे.
कंगना हिमाचल प्रदेश मधील मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढावणार आहे. ही बातमी ऐकूण कंगनाचे चाहते तिला शुभेच्छा देतायत तर काही लोक कंगनाला ट्रोल करत आहेत.
हेही वाचा 👉 कंगना राणावतची एकूण संपत्ती माहित आहे का?, मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना एका चित्रपटासाठी घेते ‘इतकी’ फी.
नुकतेच टाईम्स नाऊ वर झालेल्या एका मुलाखतीत कंगनाला “तुझे चित्रपट चालत नसल्याने तु राजकारणात येत आहेस का”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कंगनान काय उत्तर दिल पाहा..
या प्रश्नाचे उत्तर देताना कंगना म्हणाली की, असे काही नाही. चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचा प्रत्येक चित्रपट हिट होतोच असे नाही.
कंगना शाहरुख खानचे उदाहरण देत म्हणाली कि शाहरुखचे चित्रपट 10 वर्षे चालले नाहीत पण त्यानंतर पठाण चित्रपट हिट झाला. तसेच माझेही चित्रपट 7-8 वर्षे झाले चालले नाहीत, पण क्वीन चालला, काही वर्षांपूर्वी आलेला मणिकर्णिका देखील चांगला चालला. आता माझा इमरजेंसी चित्रपट येतोय, काय माहित, तो चांगला चालू शकतो.
यानंतर ती म्हणाली की, आता OTT मुळे कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी आहे. OTT मुळे आता चेहऱ्याची गरज राहिली नाही, तिथे आपल्या प्रतिभेच्या जोरावर कुणीही स्टार बनू शकत. मला सर्वजण ओळखतात आणी देवाच्या कृपेने लोकांना मि आवडते ही.
आपल्याला अभिनेत्री कंगना राणावत लवकरच ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे.
सध्या व्हायरल 👉 कंगना राणावत का काढतेय सनी लिओनीची इज्जत, सनी लिओनीलाच विचारा.