Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने रिलीज होण्यापूर्वीच मोडले ‘जवान’सह 4 सुपरहिट चित्रपटांचे विक्रम

2 Min Read
Pushpa 2 news
पुष्पा 2 बातम्या

पुष्पा 2 बातम्या : ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाची गाणी हिट ठरली होती आणि आता साऊथ सुपरस्टार (Allu Arjun) अल्लू अर्जुन च्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) म्हणजेच ‘पुष्पा द रुल’ (Pushpa the rule) चित्रपटाच्या गाण्यांबद्दल देखील लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 8 एप्रिल रोजी त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये प्रेक्षकांना अल्लू अर्जुन एका वेगळ्याच लूकमध्ये दिसला. दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा द रुल’ या चित्रपटास देवी श्री प्रसाद उर्फ ​​डीएसपी यांनी संगीत दिले आहे. ‘पुष्पा 2’ ने प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘आरआरआर’, ‘जवान’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा २’ ने रिलीज होण्यापूर्वीच ‘जावान’, ‘आरआरआर’, आणि ‘बाहुबली 2’ यांसारख्या हिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाचे संगीत हक्क ६५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

अल्लू अर्जुनाच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित होताच एका तासातच या चित्रपटाच्या टीझरने सर्वात कमी वेळात जास्त लाईक्स मिळवण्याचा विक्रम केला. ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना आवडला असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा 2’ हा सिंगल रिलीज होणारा चित्रपट असेल. ‘पुष्पा 2’ आणी अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हे दोनीही चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होते पण मात्र ‘मैदान’ चित्रपटाची अवस्था पाहता रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.

सध्या ट्रेंडिंग 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

भारतीय चित्रपटसृष्टीत आतापर्यंत ज्या चित्रपटांचे संगीत हक्क सर्वाधिक किमतीला विकले गेले ते टॉप पाच चित्रपट

चित्रपटसंगीत हक्कांची किंमत रु
साहो22 कोटी
पोन्नियिन सेल्वन24 कोटी
आरआरआर26 कोटी
जवान36 कोटी
पुष्पा 265 कोटी

हेही वाचा 👉 Pushpa 2 ला घाबरून रोहित शेट्टीने पुढे ढकलली Singham Again ची रिलीज डेट.

🔥 Pushpa 2: The Rule मध्ये David Warner नक्की असणार का? जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस