वयाच्या २८ व्या वर्षी करोडोंची मालकीण आहे रश्मिका मंदान्ना, जाणून घ्या रश्मिका मंदान्नाची एकूण संपत्ती (रश्मिका मंदानाची नेट वर्थ रुपयात)
Rashmika Mandanna Net Worth in Rupees : बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हीचा आज 28 वा वाढदिवस आहे. एक साऊथ अभिनेत्री असणारी रश्मिका मंदान्ना ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्लीच्या भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली, त्यानंतर ‘ॲनिमल’ चित्रपटात रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसली होती. ॲनिमल हिट ठरला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 900 कोटी रुपयांची कमाई केली होती.
रश्मिका मंदान्नाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेट येथे झाला. तिच्या आईचे नाव सुमन आणि वडिलांचे नाव मदन मंदान्ना आहे. रश्मिकाला एक लहान बहीणही आहे. रश्मिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे आणि तिच्या लहानपणी तिने तिच्या पालकांना आर्थिक संघर्ष देखील करताना पाहिले आहे. असे असले तरी आज वयाच्या २८ व्या वर्षी रश्मिका मंदान्ना करोडोंची मालकीण आहे. चला तर मग जाणून घेऊया किती आहे रश्मिका मंदान्ना हीच नेट वर्थ (Rashmika Mandanna Net Worth)…
रश्मिका मंदान्ना एका चित्रपटासाठी किती रुपये घेते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना एका चित्रपटासाठी सुमारे 4 कोटी रुपये घेते. चित्रपटात काम करून रश्मिका एका वर्षात 8 कोटीं रुपयांहून अधिक कमावते. चित्रपटांव्यतिरिक्त, रश्मिका अनेक जाहिराती तसेच ब्रँड प्रमोशन देखील करते.
रश्मिका मंदान्नाची एकूण संपत्ती (रश्मिका मंदानाची नेट वर्थ रुपयात)
रश्मिकाला तिच्या कमाईतील काही हिस्सा चॅरिटीसाठी दान करायला आवडते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्नाची एकूण संपत्ती 65 कोटी रुपये आहे.
सध्या व्हायरल 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.
हे फोटो पाहिले का 👉 Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ मधील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल.
रश्मिकाला गुगलने नॅशनल क्रश घोषित केले
रश्मिकाला 2020 मध्ये गुगलने नॅशनल क्रश घोषित केले होते. गुगलवर नॅशनल क्रश हा शब्द सर्च केल्यावर फक्त रश्मिकाचा फोटो येत होता. पण ‘Animal’ रिलीज झाल्यानंतर रश्मिकाला तृप्ती डिमरी हिने काट्याची टक्कर दिली आणी आता गुगलवर नॅशनल क्रश सर्च केल्यानंतर तृप्ती डिमरी हिचेही फोटो दिसतात.
हेही वाचा 👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.
रश्मिका मंदान्ना हिचे टॉप 10 बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
Sacnilk नुसार रश्मिका मंदान्ना हिच्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 छत्रपटांची यादी:
नं | चित्रपट | इंडिया नेट |
---|---|---|
10 | आडवल्लू मीकू जोहारलू | ₹ 9.57 Cr |
9 | डियर कॉम्रेड | ₹ 26.2 Cr |
8 | सुलतान | ₹ 29.3 Cr |
7 | भीष्मा | ₹ 35.6 Cr |
6 | पोगारू | ₹ 38.46 Cr |
5 | सीता रामम | ₹ 65.49 Cr |
4 | सरिलेरु नीकेव्वरु | ₹ 169.55 Cr |
3 | वारिसु | ₹ 178.14 Cr |
2 | पुष्पा: द राइज | ₹ 267.55 Cr |
1 | अॅनिमल | ₹ 553.87 Cr |
रश्मिका मंदान्नाचे आगामी चित्रपट
रश्मिकाकडे सध्या चार मोठे चित्रपट आहेत. यातील तीन तेलुगु आणि एक हिंदी चित्रपट आहे.
रश्मिका मंदान्ना आपल्याला लवकरच ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) म्हणजेच ‘पुष्पा: द रुल’ (Pushpa 2: The Rule) मध्ये ती पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रश्मिका ‘द गर्लफ्रेंड’ (The Girlfriend) आणि एका अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर विकी कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकाळावर आधारित ‘छावा’ (Chhava) मध्येही आपल्याला रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.
ट्रेंडिंग 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.