Vaibhav Mangle: ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ या गाण्याचा ट्रेंड खूप दिवसांपासून सुरू आहे. या गाण्यावर अनेक कलाकारांनी व्हिडीओज बनवले आहेत. या कामात आपले मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारही मागे नाहीत. टाईमपास मधले आपल्या दगडूचे सासरे (होणारे), वैभव मांगले आणि त्यांच्यासोबत ईतर कलाकारांनी बटरफ्लाय बटरफ्लाय गाण्यावर लईच भारी डान्स केला आहे. वैभव मांगले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओ मध्ये वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी आणि विकास चव्हाण हे कलाकार या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. बटरफ्लाय गाण्यावर मजेशीररित्या डान्स करून त्यांनी नाचगाण्याचा आनंद घेतला.
वैभव मांगले यांनी शेयर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या आपल्या मराठी कलाकारांच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. आणी हा व्हिडीओ पाहून नेटकरिही आनंद लुटत आहेत.
हेही वाचा 👉 अंकिता लोखंडेला ‘पवित्र रिश्ता’ साठी मिळायच फक्त “इतक” मानधन, आज आहे कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण.