Video : “माझ नाव करिश्मा नाही…”, छामियान सांगितल तीच खर नाव, आज पर्यंत कुणालाच माहित नव्हत

3 Min Read
Karisma Kapoor Name Pronunciation Revelation Viral Video
Karisma Kapoor Name Pronunciation Revelation Viral Video

Karisma Kapoor : करिश्मा कपूर सध्या तिच्या १५ मार्च २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘मर्डर मुबारक’ (Murder Mubarak) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर पंकज त्रिपाठी, सारा अली खान आणी विजय वर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. नुकतेच नेटफ्लिक्सवर त्यांची एक मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत करिष्मा कपूर ला तिच्या नावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तुझ्या नावाचा नेमका उच्चार काय आहे? या प्रश्नाच उत्तर देताना तीन तीच खर नाव काय आहे याचा खुलासा केला. तीच नाव ऐकून तिथ उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केल, कुणालाच तीच नेमक नाव काय आहे ते ठाऊक न्हवत सगळे तीच नाव (Karisma Kapoor) करिश्मा हेच आहे समजायचे.

‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ९० च्या दशकात हसीना मान जायेगी, दिल तो पागल है, हिरो नंबर १, अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना जीन वेड लावल त्या करिश्माला फिल्म इंडस्ट्रीत आज ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतकी वर्षे होऊन देखील करिश्मावर तिच्या चाहत्यांच असणार प्रेम अजून आधी होत तितकच आहे.

नेटफ्लिक्सच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करिश्मान तिच्या नावाचा खरा उच्चार नेमका काय आहे याबाबत सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान तिथे (Pankaj Tripathi) पंकज त्रिपाठी, (Sara Ali Khan) सारा अली खान, (Vijay Varma) विजय वर्मा उपस्थित होते, त्या तिघांनाही करिश्माच्या नावाचा नेमका उच्चार माहित नव्हता.

मुलाखतीत करिश्मान सांगितल कि “माझं नाव करिश्मा नाही ते करिज्मा (karisma) असं आहे.” हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटल. यावर सारा अली खान म्हणाली, “मग तू एवढी वर्षे तुझ्या नावाचा चुकीचा उच्चार होतोय हे सर्वांना सांगितल का नाहीस?” यावर करिश्मा म्हणाली, ” कित्येक वर्षे मी काम करतेय लोक मला प्रेमाने करिश्मा म्हणत असतील तर त्याला काय हरकत आहे? म्हणून मी कधीच काही बोलत नाही. पण माझ मूळ नाव करिज्मा असच आहे.” अस तीन सांगितल.

करिश्मा कपूर चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना देखील करिश्मा कपूरच्या नावाचा खरा उच्चार करिज्मा आहे हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.

लेटेस्ट 👉 सुनील शेट्टी आण्णा माधुरी बरोबर होळीची पार्टी करून लोड आहे काय? VIDEO व्हायरल.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस