Yodha : ‘योद्धा’ च्या निर्मात्यांनी आणली प्रेक्षकांसाठी एक मोठी ऑफर

3 Min Read
Yodha picture offer ekavar ek ticket free

Yodha : ‘योद्धा’ च्या निर्मात्यांनी आणली प्रेक्षकांसाठी एक मोठी ऑफर; आता तिकीट खरेदी करा 1 मिळवा 1 मोफत

Yodha Buy 1 get 1 Free : हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra), दिशा पटानी (Disha Patani), आणि राशि खन्ना (Rashi Khanna), मुख्य भूमिकेत आहेत. Yodha हा चित्रपट 15 तारखेला शुक्रवारी प्रदर्शित झाला, Yodha पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस वर मोठे कलेकशन करू शकला नाही, आणी अशातच Yodha Release च्या पहिल्याच दिवसानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक मोठी ऑफर दिली आहे, जी (yodha offer) जाणून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आपण जर Yodha चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आता हा चित्रपट कमी पैशात पाहू शकाल.

Yodha Movie Offer : ॲक्शन थ्रिलर ‘योद्धा’ काल 15 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी चित्रपटाने फारसा बिझनेस केला नाही.  योद्धा चित्रपटाचा व्यवसाय आणखी वाढवण्याच्या दिशेने निर्मात्यांनी योद्धा रिलीज च्या पहिल्याच दिवसानंतरच आपले पाऊल उचलले आहे.

हेही वाचा 👉 Yodha Day 1 Box Office: योद्धाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; बस्तर-द नक्सल स्टोरी सोबत कडवी टक्कर.

पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे दिग्दर्शित ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, दिशा पटानी आणि राशि खन्ना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. करण जोहर दिग्दर्शित चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसून आला.

‘योद्धा’ कडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. योद्धा’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांमध्ये मोठी कमाई करेल असे त्यांना वाटत होते, मात्र तसे हाऊ शकले नाही.  योद्धा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर पहिल्या दिवशी खूपच थंड सुरुवात केली. पहिल्या दिवशी ‘योद्धा’ च्या खात्यात फक्त 4.25 कोटी रुपये जमा झाले. त्यामुळेच चित्रपटाचा व्यवसाय वाढवण्यासाठी निर्मात्यांनी एक ऑफर जाहीर केली आहे, ज्यामुळे चित्रपटाची कमाई वाढेल असे त्यांना वाटते.

‘योद्धा’ रिलीज झाल्याच्या एका दिवसातच एक मोठी ऑफर आली आहे.  या अंतर्गत, प्रेक्षक एक विनामूल्य तिकीट खरेदी करून चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी X वर एक पोस्ट शेअर करत ‘योद्धा’साठी मोठी ऑफर आल्याचे सांगितले आहे. त्यानुसार प्रेक्षकांना एक तिकीट खरेदीवर एक तिकीट फ्री दिले जाईल.

X वर शेयर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे, “योद्धा Buy 1 Get 1 free Ticket Offer. आता ‘योद्धा’ पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना या योद्धा च्या ऑफरमुळे फायदा मिळेल. या ऑफरमुळे योद्धा च्या मेकर्सना वीकेंडचा फायदा मिळू शकतो. आता योद्धा बाय वन गेट वन ऑफरने वीकेंडला कितपत बिझनेस करतो हे मात्र आत्ताच निश्चित सांगता येऊ शकत नाही.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस