सोनाक्षी सिन्हा रिसेप्शन: नुकतच सोनाक्षी सिन्हा आणी झहीर इक्वाल यांचे लग्न झाले. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाने पती झहीर इक्बाल सोबत रिसेप्शनमध्ये ग्रँड एन्ट्री केली, लाल साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
सोनाक्षी सिन्हा रिसेप्शन: सोनाक्षी सिन्हाने आज तिचा प्रियकर झहीर इक्बाल याच्यासोबत मुंबईतील निवासस्थानी लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती पण यानंतर तिने आपल्या सर्व पाहुण्यांसाठी खास रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
लाल साडीत खूपच सुंदर दिसत होती सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नात पांढऱ्या रंगाची साडी नेसली असली तरी रिसेप्शनदरम्यान सोनाक्षी लाल रंगाच्या सुंदर साडीत दिसत होती, या साडीत ति नवविवाहित वधूच्या लूक मध्ये दिसत होती आणि तिच्यासोबत झहीर इक्बालने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होता. सोनाक्षीने तिच्या केसांमध्ये सिंदूर आणि हातात लाल बांगड्या घातल्या होत्या, ज्यामुळे ती पारंपारिक नववधूसारखी दिसत होती. तिने तिच्या केसात एक सुंदर गजरा देखील घातला होता.
🔴 ट्रेंडिंग 🔴 👉 सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानची ग्रँड एन्ट्री; कडक बंदोबस्तात आले पांडेजी, पाहा व्हिडीओ.
🔥 हेही पाहा 👉 Sonakshi Sinha Marriage Photos: सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल, फोटोंवरून नजर हटवू शकणार नाही.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लग्न समारंभ
रिसेप्शन पार्टीला त्यांचे कुटुंब आणि नातेवाईकांव्यतिरिक्त, बिग बॉस ओटीटी 3 चे होस्ट अनिल कपूर, चंकी पांडे, हुमा कुरेशी, रवीना टंडन, काजोल, रॅपर हनी सिंग, रेखा, तब्बू आणि इतर अनेक सिनेतारकांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली, अनेक दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माते या रिसेप्शनला उपस्थित होते.