सोनाक्षी-झहीरच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानची ग्रँड एन्ट्री; कडक बंदोबस्तात आले पांडेजी, पाहा व्हिडीओ

2 Min Read
sonakshi sinha zaheer iqbal reception salman khan grand entry video
sonakshi sinha zaheer iqbal reception salman khan grand entry video

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रविवारी (23 जून) रोजी लग्न झाले. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या काही तासांनंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनिल कपूर, रेखा, रवीना टंडन, काजोल, अरबाज खान, हनी सिंग आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, सलमान खानच्या धमाकेदार एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Salman khan sonakshii marriage
Image Source: इंस्टाग्राम

सोशल मीडियावर सलमानचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये, अभिनेता मुंबईच्या लिंकिंग रोडवर असलेल्या बास्टन या ट्रेंडी रेस्टॉरंटमधील रिसेप्शनच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री करताना दिसत आहे. कडक सुरक्षा बंदोबस्तात नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी अभिनेता पोहोचला.  काळ्या रंगाच्या सूटमध्ये तो खूपच जबरदस्त दिसत होता. सोनाक्षी आणि झहीरचे अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर तो रिसेप्शनमधून लगेच निघून गेला.

Sonakshi wedding salman khan pic
Image Source: इंस्टाग्राम

सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये दोघेही ‘आफरीन आफरीन’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसले. दोघे एकत्र आनंदी दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत होती. काजोलने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नवविवाहित जोडप्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

Sonakshi Sinha wedding salman Khan photo
Image Source: इंस्टाग्राम

लग्नानंतर सोनाक्षी पहिल्यांदाच लाल रेशमी साडी परिधान करताना दिसली होती, ज्यामध्ये तिने हिरवा आणि सोनेरी नेकलेस, मॅचिंग ड्रॉप इअरिंग्ज आणि लाल बांगड्या घातल्या होत्या. रिसेप्शन पार्टीत तिने कपाळावर सिंदूर लावलेला दिसला. तर झहीरने लाइट गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी शेरवानी परिधान केली होती.

🔴 सध्या व्हायरल 👉 सोनाक्षी सिन्हा सह या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची आहे गणपतीवर अपार श्रद्धा,📷👀फोटो पाहून बसेल धक्का..

🔥 हेही पाहा 👉 Sonakshi Sinha Marriage Photos: सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल, फोटोंवरून नजर हटवू शकणार नाही.

सोनाक्षी नुकतीच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याची कमाल दाखवू शकला नाही.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई