Shaitan On Ott Platform Release Date: अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या शैतान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमी केली. रिलीज नंतर दुसऱ्या आठवड्यातही शैतान चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच शैतान ओटीटी प्लॅटरफॉर्म वर कधी रिलीज होणार कोणत्या ओटीटी प्लॅटरफॉर्मवर येणार या चर्चेने जोर धरला आहे. चला तर मग जाणून घेऊया शैतान ओटीटीवर कुठे आणी कधी रिलीज होणार आहे
Sacnilk रिपोर्टनुसार, ‘शैतान’ चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 1.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि शैतानचे एकूण कलेक्शन 116.25 कोटींवर गेले आहे. शैतान च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर शैतान या चित्रपटाने एकूण 167 कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा 👉 Shaitan: शैतानने बॉक्स ऑफिसवर पार केला ‘इतक्या’ कोटींचा आकडा, जाणून घ्या 2 आठवड्यांचे कलेक्शन.
सध्या व्हायरल 👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.
या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार शैतान
सध्या कोणताही चित्रपट थिएटरमध्ये चांगला चालला कि लगेच OTT वर प्रदर्शित होतो. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच OTT प्लॅटफॉर्म त्याचे डिजिटल अधिकार खरेदी करतात. आणी प्रेक्षकही OTT प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट पाहणे पसंद करतात. शैतान बद्दल बोलायचे झाले तर. नेटफ्लिक्सने अजय देवगणच्या शैतान चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे आता शैतान नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल यात शंका नाही, मात्र, नेटफ्लिक्स कडून शैतान ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा 👉 Jannat 3: ‘जन्नत 3’ रिलीज बद्दल इमरान हाशमीने केला खुलासा, हा चित्रपट माझ्यासाठी नई बोतल में पुरानी शराब.