Randeep Hooda: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ मधील अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) बॉलीवूडमध्ये आपल्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे. कोणाला आवडो वा न आवडो रणदीप हुड्डा नेहमी खरेच बोलतो. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रणदीप हुड्डा ‘हायवे’ चित्रपटातील त्याची सहकलाकार आलिया भट्ट हिच्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसला. त्यावेळी बोलताना रणदीप हुड्डाने कंगना राणावत (Kangana Ranaut) बद्दलचे आपले विचारही मीडियासोबत शेअर केले.
रणदीप हुडा स्वतःचे मत मांडायला घाबरत नाही. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान मीडियाशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘मला आलिया भट्टसोबत एक वेगळेच कनेक्शन जाणवते’. तिला माझ्याबद्दल काय वाटते हे मला माहित नाही, परंतु मी तिचा खूप आदर करतो.
आलिया आणि कंगना यांच्यातील वादाबद्दल बोलताना रणदीप म्हणाला, कंगना जरी आलियाला खालच्या दर्जाची अभिनेत्री म्हणत असली तरी मी तिला नेहमीच वेगळे आणि चांगले काम करताना पाहिले आहे. आलिया भट्ट ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
रणदीप हुड्डा आणि आलिया भट्ट इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ चित्रपटात एकत्र दिसले होते. रणदीप म्हणाला, ‘तुम्ही स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीचा भाग मानत नसला तरी, हळूहळू काम करत असताना तुम्हीही या इंडस्ट्रीचा एक भाग बनता’. ईतर कलाकाराची खिल्ली उडवणे किंवा त्यांच्यावर टीका करणे हे कोणत्याही कलाकाराला शोभत नाही.
अभिनेत्री कंगना राणावतने एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टला एक खालच्या दर्जाची अभिनेत्री म्हटले होते. त्याचबरोबर ‘गली बॉय’ या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचीही खिल्ली उडवली होती. यावर आलियाने कंगनाला प्रतिउत्तर दिले न्हवते. रणदीप हुड्डाने यासाठी आलियाचे खूप कौतुक केले.
आज व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.
👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.