Ramayan Movie 2024 : सध्या जेंव्हा पासून अयोध्येमध्ये भगवान श्री राम मंदिराचे लोकार्पण झाले तेंव्हा पासून ‘रामायण’ हे पौराणिक महाकाव्य आणखीनच चर्चेत आले आहे. आता तर यावर सिनेमा ही बनत आहे तो ही अगदी भव्यदिव्य, हो सुपरहिट दंगल सिनेमाचे दिग्दर्शक (Nitesh Tiwari) नितेश तिवारी आता ‘रामायण’ (Ramayana) हा सिनेमा बनवत आहेत. तसेच हा नवीन रामायण चित्रपट एकूण 3 भागात प्रदर्शित होणार असून यात संपूर्ण रामायण म्हणजे प्रभू श्रीराम जन्म यापासून सीता मातेशी लग्न, वनवास ते रावण वध इथपर्यंत पूर्ण दाखवण्यात येणार आहे.
नितेश तिवारी यांनी 2 एप्रिल 2024 रोजी सेटवर एका भव्य महापूजेने ‘रामायण’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. आणि आता बातमी अशी आहे कि या चित्रपटावार एकूण 600 कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. या सिनेमाचा फक्त सेटच 11 ते 12 कोटी रुपयांचा आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन रामायण चित्रपटामधील कलाकारांबद्दल, कोण आहेत कलाकार आणी त्यांना याबद्दल किती पैसे मिळत आहेत.
रणबीर कपूर बनतोय राम
सध्याच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ने सुपर हिट सिनेमा ‘अॅनिमल’ (Animal) दिल्यामुळे त्याने त्याच्या फी मध्ये प्रचंड वाढ केलेली दिसून येत आहे. त्याने रामायण च्या प्रत्येक पार्ट साठी 75 करोड रुपये फी घेतल्याचे वृत्त आहे, म्हणजेच रणबीर कपूर रामायण च्या 3 पार्ट्स साठी घेतोय एकूण 225 कोटी रुपये. रणबीर कपूर ची एकट्याची फी ही एका बॉलीवूड सिनेमाच्या बजेट पेक्षा मोठी असल्याचे दिसून येते.
साऊथ क्वीन साई पल्लवी बनतेय सीता
साऊथ मधील हिट अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही तिच्या रावडी बेबी (Rowdy Baby) गाण्यासाठी तर खास ओळखली जातेच. शिवाय ती साऊथ मध्ये एका चित्रपटासाठी 3 करोड रुपये घेते. ती रामायण मधील सीता च्या रोल साठी 3 भागासाठी प्रत्येकी 6 करोड रुपये म्हणजे 18 करोड रुपये घेणार आहे.
🔥 “Kgf स्टार यश बनतोय रावण”
साऊथ सुपरस्टार आणी आता जगभरात आपल्या kgf या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला ‘यश’ (KGF Star Yash) हा नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटात रावनाची (Yash as Ravan) भूमिका साकारतोय. वृत्तानुसार यशला या रोल साठी प्रत्येक भागासाठी 50 करोड रुपये म्हणजे एकूण 150 कोटी रुपये मिळणार आहेत. सुपरस्टार यश ला रावणाच्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत.
हनुमान बनतोय सनी देओल.
गदर आणी गदर 2 (Gadar 2) या सिनेमातून आपली खास ओळख सोडणाऱ्या आणी ‘2.5 किलो का हात’ या फेमस डायलॉग मुळे हिट अभिनेता सनी देओल हा या चित्रपटात हनुमानाचा रोल करणार असून (sunny deol as hanuman) त्याला प्रत्येक पार्टसाठी 45 कोटी रुपये मिळणार आहेत म्हणजेच एकूण 135 कोटी रुपये.
सध्या व्हायरल 👉 Pushpa 2: The Rule मध्ये David Warner नक्की असणार का? जाणून घ्या.
👉 हा आहे सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, मिळत नव्हत एकही थिएटर.