मडगाव एक्सप्रेस बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3 रा.
Madgaon Express Box Office Collection Day 3 : अभिनेता कुणाल खेमूच्या दिग्दर्शनाखाली बनलेला मडगाव एक्सप्रेस हा त्याचा पहिला चित्रपट आहे. मडगाव एक्स्प्रेस हा एक विनोदी चित्रपट असून
हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
(Randeep Hooda) रणदीप हुड्डाचा आलेला चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar) सोबत मडगाव एक्सप्रेस २२ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मडगाव एक्सप्रेस हा एक कमी बजेटमध्ये बनलेला चित्रपट असून रिलीज होऊन फक्त तीन दिवस झाले आहेत आणि तरी देखील मडगाव एक्स्प्रेस बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई करत आहे.
मडगाव एक्स्प्रेस चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 7 कोटींहून अधिक कमी केली:
SACNILC च्या अहवालानुसार, “मडगाव एक्सप्रेसने पहिल्या दिवशी 1.5 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊन चित्रपटाने 2.75 कोटी रुपयांची कमाई केली. आणी तिसऱ्या दिवशी रविवारी मडगाव एक्सप्रेसने 2.85 कोटींची कमाई केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 7.10 कोटींचा व्यवसाय केला आहे.
ट्रेंडिंग 👉 Video : “माझ नाव करिश्मा नाही…”, छामियान सांगितल तीच खर नाव, आज पर्यंत कुणालाच माहित नव्हत.
बॉक्स ऑफिसवर कुणाल खेमुच्या मडगाव एक्स्प्रेस चित्रपटाने रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ला कमाईत मागे टाकले आहे. ‘मडगाव एक्स्प्रेस’ने तीन दिवसांत 7.10 कोटींची कमाई केली आहे आणी रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाने तीन दिवसात केवळ 5.90 कोटी कमावले आहेत.
मडगाव एक्स्प्रेसच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर दिव्येंदू, अविनाश तिवारी, प्रतीक गांधी आणि नोरा फतेही या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
सध्या व्हायरल 👉 सुनील शेट्टी आण्णा माधुरी बरोबर होळीची पार्टी करून लोड आहे काय? VIDEO व्हायरल.