Kapkapiii Movie : तुषार कपूर आणी श्रेयस तळपदेचा ‘कपकपी’ चित्रपट लवकरच येतोय, दिग्दर्शक आपल्याला पोट धरून हसायला लावणारे

2 Min Read
kapkapiii Movie Tusshar Kapoor Shreyas Talpade
kapkapiii Movie Tusshar Kapoor Shreyas Talpade

Kapkapiii Movie : ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांना हसवणारी जोडी अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर आता आपल्याला पुन्हा एकदा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तुषार कपूर आणी श्रेयस तळपदे प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ‘कपकपी’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची आज २१ मार्च रोजी घोषणा करण्यात आली. ‘कपकपी’ चित्रपटाचे मोशन पोस्टरही आज २१ मार्च रोजी प्रदर्शित झाले आहे. त्याचबरोबर कपकपी चित्रपटाशी संबंधित काही माहिती देखील शेअर करण्यात आली आहे.

‘क्या कूल हैं हम’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांचा हा चित्रपट आहे. तर सौरभ आनंद आणि कुमार प्रियदर्शी यांनी कपकपी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. जयेश पटेलच्या ब्राव्हो एंटरटेनमेंट या बॅनरखाली कपकपी ची निर्मिती करण्यात आलेली आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर कपकपी चे मोशन पोस्टर शेअर केले आहे. तर kapkapi चित्रपट रिलीज तारीख अजून फिक्स झालेली नाही. पण हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

नवीन रिलीज 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.

कपकपी स्टार कास्ट

कपकपी चित्रपटात श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर व्यतिरिक्त सोनिया राठी, सिद्धी इदनानी, जय ठक्कर, वरुण पांडे, धीरेंद्र तिवारी, दिनकर शर्मा आणि अभिषेक कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याचबरोबर, श्रेयस तळपदे आपल्याला लवकरच ‘लव्ह यू शंकर’ या चित्रपटात दिसणार आहे, ‘लव्ह यू शंकर’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.  त्याचबरोबर श्रेयसचा ‘गोलमाल 5’ आणि इमर्जन्सीही लवकरच आपल्या भेटीला येत आहेत.

हेही वाचा 👉 Sara Ali Khan: ‘ऐ वतन मेरे वतन’ मधील अभिनेत्री सारा अली खान म्हणाली- माझ विनोदी असण मूर्खपणा आहे का?.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस