Chandal Choukadichya Karamati : यूट्यूब वरील चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज तर तुम्हाला माहीतच असेल. बघता बघता चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीजन अख्या महाराष्ट्राला आपलस केल. वेबसिरीज सुरु होऊन 4 वर्षे झाली आणी वेब सिरीजचे 200 पेक्षा जास्त एपिसोड प्रदर्शित झाले. गावरान फिल्म्स प्रोडक्शन यूट्यूब सब्सक्राइबरांची संख्या 2 मिलियन च्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत. तरी देखील अजुनपण रविवारी दिवस उजेडला कि चांडाळ चौकडीचा नवा एपिसोड प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात.
वेब सिरीज मधील हरहुन्नरी कलाकार प्रणव मदने म्हणजेच आपला छोटया भाई याचा 23 मार्च रोजी वाढदिवस झाला. चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीजच्या शूट दरम्यान संपूर्ण टीमन केक कापून व आपले आशीर्वाद देऊन छोटया भाईचा वाढदिवस साजरा केला.
👉 शैतान 2 Movie: IPL 2024 ही रोखू शकले नाही, शाहरुखच्या ‘या’ चित्रपटाला टाकले मागे.
बाळासाहेबांनी प्रणव मदने याला त्याच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याच बरोबर महाराष्ट्रातले एकमेव इंटरनॅशनल पुढारी, आपल्या सर्वांचे लाडके रामभाऊ यांनी देखील प्रणवला शुभेच्छा दिल्या, रामभाऊंचे सासरे आण्णा, बलभीम पाटील, गणा पैलवान, अमीर, संजू शेठ, उज्जन, प्रणव मदनेचे वडील आपले तंटामुक्ती अध्यक्ष सुभाषराव यांनी देखील प्रणवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आपल्या चेअरमन अण्णांनी त्यांच्या जबरदस्त आवाजात गाण म्हणून छोट्या भाईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.