बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत शैतान चित्रपट चांगलीच कामगिरी दाखवत आहे. शैतानने रिलीजच्या 20 व्या दिवशीही मोठे कलेक्शन केले आहे.
शैतानच्या कमाईवर आयपीएल 2024 (IPL 2024) चा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही.
शैतान हा हॉरर थ्रिलर चित्रपट दररोज चांगल्या कमाईसह पुढची वाटचाल करत आहे.
बुधवारी शैतानने जवळपास 1.55 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासोबतच या चित्रपटाने रिलीजच्या २० व्या दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकले आहे.
डंकीने 20 व्या दिवशी सुमारे 1.40 कोटी रुपये कमवले होते तर शैतानने 20 व्या दिवशी जवळपास 1.55 कोटींची कमाई केली आहे.
शैतान हा चित्रपट येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर 150 कोटींच्या पुढे कमाई करेल.
📽️ महाराष्ट्रातील काळ्या जादूसाठी प्रसिद्ध असलेल्या 'या' ठिकाणी लवकरच सुरु होतय शैतान 2 च शूटिंग. संपूर्ण बातमी खाली वाचा 👇