Amitabh Bachchan Health Update : शुक्रवारी अमिताभ बच्चन यांच्याबाबत बातमी आली होती की ते त्यांच्या रुटीन चेकअपसाठी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात गेले होते आणि त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता खुद्द बिग बींनी सोशल मीडियावर सत्य सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे वृत्त फेटाळले आहे. ते अभिषेक-सचिन तेंडुलकरसोबत क्रिकेट मॅच एन्जॉय करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी पहाटे ३ च्या सुमारास एक्स (ट्विटर) वर पोस्ट शेअर करून प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त फेटाळून लावले. त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत स्टेडियमवरील छायाचित्रे शेअर केली, ज्यामध्ये बिग बी सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
या पोस्टसोबत बिग बींनी लिहिले की, “महान सचिनला क्रिकेट खेळाविषयी असलेल्या अफाट ज्ञानाने भारावून गेलो.” सामना पाहून स्टेडियममधून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांना विचारले की, ते ठीक आहेत का? त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ते आजारी असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
हेही वाचा 👉 Yodha Day 1 Box Office: योद्धाने पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; बस्तर-द नक्सल स्टोरी सोबत कडवी टक्कर.