Emraan Hashmi Birthday: आज २४ मार्च बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीचा वाढदिवस, इम्रान हाश्मी आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. अलीकडेच इम्रान हाश्मी आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसला, ज्यामध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
आज इम्रान हाश्मीच्या वाढदिवसा दिवशीच इम्रानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे इम्रान हाश्मी या वर्षी साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. इम्रान आपल्याला दिग्दर्शक सुजीतच्या ‘ओजी’ या गँगस्टर ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा 👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.
इम्रानच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी आज (og first look) ‘ओजी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटात इम्रान ‘ओमी भाऊ’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी साऊथचा सुपरस्टार पवन कल्याण याच्या सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
सध्या ‘दे कॉल हिम ओजी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, ज्यामध्ये इम्रान हाश्मी आणि पवन कल्याण यांच्यासोबत प्रियंका अरुल मोहन, अर्जुन दास, प्रकाश राज, सुभलेखा सुधाकर, श्रिया रेड्डी, हरीश उथमान, तेज सप्रू, अभिमन्यू हे कलाकार आहेत. ओजी हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता इम्रान साउथ इंडस्ट्रीत काय कमाल दाखवतो हे लवकरच समजेल.
हेही वाचा 👉 श्रद्धा कपूरच्या प्रेमाला मिळाली घरच्यांची मंजूरी, ‘याच्याशी’ लवकरच करणार लग्न.