Mother's Day 2024 : आपल्या मुलांना एकट्या वाढवत आहेत या 5 प्रसिद्ध अभिनेत्री

या अभिनेत्री केवळ एक चांगली अभिनेत्री नाही तर एक चांगली आई देखील आहेत.अनेक टीव्ही अभिनेत्री आपल्या मुलांना एकट्याने वाढवत आहेत. अशा काही अभिनेत्री आहेत ज्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्या मुलांना एकट्याने वाढवत आहेत.

Image Credit: insta/asopacharu

चारू असोपा टीव्ही अभिनेत्री चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. राजीव आणि चारू यांना एक मुलगी आहे. 2023 मध्ये राजीव सेनपासून विभक्त झाल्यानंतर ही अभिनेत्री आपल्या मुलीला एकटी वाढवत आहे.

Image Credit: insta/kaurdalljiet

दलजीत कौर या यादीत अभिनेत्री दलजीत कौरच्या नावाचाही समावेश आहे. दलजीतचे पहिले लग्न मोडले. तिला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर ती एकटीच आपल्या मुलाचे संगोपन करत आहे.

Image Credit: insta/sakshitanwarworld

साक्षी तन्वर यात टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री साक्षी तन्वरच्या नावाचाही समावेश आहे. साक्षी तन्वर अविवाहित आहे.  वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी लग्न केलेले नाही. पण त्यांनी 2018 मध्ये एक मुलगी दत्तक घेतली. ती एकटीच आपल्या मुलीला वाढवत आहे.

Image Credit: insta/shweta.tiwari

श्वेता तिवारी श्वेता तिवारीने तिच्या दमदार अभिनय आणि हॉटनेसच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  श्वेताची दोन लग्न झालेत, पण दोन्ही टिकली नाहीत. श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरीशी झाले होते, ज्याच्यापासून तिला पलक तिवारी ही मुलगी झाली. तिने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले, ज्याच्यापासून तिला रेयांश हा मुलगा झाला. अभिनेत्रीची ही दोन्ही लग्न टिकली नाहीत. यानंतर श्वेता एकटी तिच्या दोनी मुलांचे संगोपन करत आहे.

Image Credit: insta/juhiparmar

जुही परमार प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रींपैकी एक, जुही परमार टीव्ही मालिका 'कुमकुम' द्वारे घराघरात पोहोचली. जुहीने 2009 मध्ये टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफशी लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर 2013 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला, मात्र परस्पर मतभेदांमुळे 2019 मध्ये सचिन आणि जुही वेगळे झाले. अशा परिस्थितीत जुहीनेही सिंगल मदर बनून आपल्या मुलीचे संगोपन केले.

🔴ट्रेंडिंग🔉🔥'माधुरी'ने खरेदी केली सुपर लक्झरी SUV, किंमत आहे खूपच कमी ,📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇