Image Credit : सोशल मीडिया

MLA P N Patil Death : आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Image Credit : सोशल मीडिया

आमदार पी. एन. पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते.

Image Credit : सोशल मीडिया

बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Image Credit : सोशल मीडिया

त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने आधारमध्ये दाखल करून तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

Image Credit : सोशल मीडिया

मात्र, त्यांच्या मेंदूची सूज कायम होती. त्यामुळे प्रकृती स्थिर असली तरी गंभीर होती.

Image Credit : सोशल मीडिया

मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. सुहास बराले यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पी. एन. पाटील यांच्यावर उपचार सुरु होते.

Image Credit : सोशल मीडिया

आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ट्रेंडिंग 🔴आमदार पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी केलेला झंझावाती प्रचार,🔥 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇