कोण आहे Payal Kapadia? जिच्या 'या' चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये निवड झाली

Image Credit: सोशल मीडिया

14 ते 25 मे दरम्यान प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होत आहे.

Image Credit: सोशल मीडिया

यामध्ये पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाचा पाम डिओर पुरस्कार (गोल्डन पाम अवॉर्ड) स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. गेल्या 30 वर्षांत कान्सच्या या विभागात पोहोचणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Image Credit: सोशल मीडिया

पायल कपाडिया ही एक भारतीय चित्रपट निर्माती आहे. पायलला तिच्या 'अ नाईट ऑफ नोइंग नथिंग' या माहितीपटासाठी 2021 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओइल डी'ओर (गोल्डन आय) पुरस्कार मिळाला होता.

Image Credit: सोशल मीडिया

2017 मध्ये, तीचा चित्रपट आफ्टरनून क्लाउड्स हा 70 व्या कान चित्रपट महोत्सवासाठी निवडलेला गेलेला एकमेव भारतीय चित्रपट होता.

Image Credit: सोशल मीडिया

पायल कपाडियाचा जन्म मुंबईत झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने अर्थशास्त्रात पदवी संपादन केली. यानंतर तिने सोफिया कॉलेजमधून एक वर्षाची पदव्युत्तर पदवी घेतली.

Image Credit: सोशल मीडिया

पायलने 2014 मध्ये 'वाटरमैलन, फिश एंड हाफ घोस्ट' या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण केले. पायलने दिग्दर्शित केलेला हा लघुपट आहे. यानंतर तिने आणखी काही लघुपटांचे दिग्दर्शन केले.

Image Credit: सोशल मीडिया

पायलचा 'All We Imagine as Light' हा चित्रपट एका नर्सच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात नर्स बनलेल्या मुख्य पात्राचे नाव प्रभा आहे.

🔴ट्रेंडिंग🔉☀️😎उन्हाळ्याला वैतागून उर्फी जावेदन केल टक्कल,👩‍🦲तीच नवीन रूप पाहून चाहते हैरान😤😠🔥📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇