‘सोढी’ वर होते कर्ज, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून चमकला, नंतर अचानक अभिनयापासून दुरावला गुरुचरण सिंग

2 Min Read
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gurucharan Singh latest news marathi
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Gurucharan Singh latest news marathi

Gurucharan Singh: रोशन सिंग सोढी म्हणजेच (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता आहे. 22 एप्रिल रोजी हा अभिनेता अचानक गायब झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अभिनेता अचानक बेपत्ता झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

गुरुचरण सिंग उर्फ ​​सोढी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांचे चाहते चिंतेत आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंग लग्न करणार होते आणि त्याशिवाय ते आर्थिक संकटातून जात होते. अशा परीस्थितीत गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याने सोढीचे चाहते चिंतेत आहेत.

गुरुचरण सिंग यांना तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम मिळण्यापूर्वी गुरुचरण सिंग यांनी कर्ज घेतले होते आणि त्याच दरम्यान, त्यांना तारक मेहताका उल्टा चष्मा शोमध्ये काम करण्याची ऑफर आली. अशा परिस्थितीत हे कर्ज फेडण्यासाठी गुरुचरण सिंग यांनी या ऑफरला होकार दिला. त्यानंतर गुरुचरण सिंग सोढी बनून घराघरात प्रसिद्ध झाला.

गुरचरण सिंग 2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये काम करत होते पण 2013 नंतर असित मोदीसोबत झालेल्या वादामुळे त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी सोढीच्या भूमिकेत गुरचरण सिंग इतका प्रसिद्ध झाला होता की इतर कोणत्याही अभिनेत्याला सोढीच्या भूमिकेसाठी कास्ट केल्याने निर्मात्यांचे नुकसान होऊ शकले असते म्हणून गुरुचरण सिंग यांना शोमध्ये पुन्हा बोलावण्यात आले.

गुरुचरण सिंगच्या पुनरागमनानंतर, त्यांनी दीर्घकाळ चाहत्यांचे मनोरंजन केले परंतु 2020 मध्ये कोरोनाच्या काळात त्यांनी पुन्हा शो सोडला. त्यावेळी त्याच्या वडिलांची प्रकृती खूपच बिकट होती, त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी गुरुचरण सिंग यांनी TMKOC शो सोडला. यानंतर गुरुचरण सिंग अभिनयापासून दुरावले होते.  सध्या पोलीस गुरुचरण सिंग यांचा शोध घेत आहेत.

🔥 ट्रेंडिंग 👉गायब होण्यापूर्वी लग्न करणार होता सोढी! जाणून घ्या गुरुचरण सिंह बद्दलची ताजी बातमी.

👉 बॉलिवूड ‘चॉकलेट बॉय’ ऋषी कपूर होते क्रिकेट प्रेमी, सीसीएलच्या ‘या’ टीमचे होते मालक.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस