सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे रविवारी (23 जून) रोजी लग्न झाले. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नाच्या काही तासांनंतर रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनिल कपूर, रेखा, रवीना टंडन, काजोल, अरबाज खान, हनी सिंग आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, सलमान खानच्या धमाकेदार एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सोशल मीडियावर सलमानचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये, अभिनेता मुंबईच्या लिंकिंग रोडवर असलेल्या बास्टन या ट्रेंडी रेस्टॉरंटमधील रिसेप्शनच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री करताना दिसत आहे. कडक सुरक्षा बंदोबस्तात नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी अभिनेता पोहोचला. काळ्या रंगाच्या सूटमध्ये तो खूपच जबरदस्त दिसत होता. सोनाक्षी आणि झहीरचे अभिनंदन करून त्यांना आशीर्वाद दिल्यानंतर तो रिसेप्शनमधून लगेच निघून गेला.

सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये दोघेही ‘आफरीन आफरीन’ गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसले. दोघे एकत्र आनंदी दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत होती. काजोलने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नवविवाहित जोडप्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

लग्नानंतर सोनाक्षी पहिल्यांदाच लाल रेशमी साडी परिधान करताना दिसली होती, ज्यामध्ये तिने हिरवा आणि सोनेरी नेकलेस, मॅचिंग ड्रॉप इअरिंग्ज आणि लाल बांगड्या घातल्या होत्या. रिसेप्शन पार्टीत तिने कपाळावर सिंदूर लावलेला दिसला. तर झहीरने लाइट गोल्डन एम्ब्रॉयडरी असलेली पांढरी शेरवानी परिधान केली होती.
🔴 सध्या व्हायरल 👉 सोनाक्षी सिन्हा सह या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची आहे गणपतीवर अपार श्रद्धा,📷👀फोटो पाहून बसेल धक्का..
🔥 हेही पाहा 👉 Sonakshi Sinha Marriage Photos: सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल, फोटोंवरून नजर हटवू शकणार नाही.
सोनाक्षी नुकतीच बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्याची कमाल दाखवू शकला नाही.