Jawan: शाहरुख खानच्या ‘जवान’ चा दुसरा भाग बनणार? ॲटलीने केला खुलासा

2 Min Read
Shahrukh khan jawan sequel atlee reveals
Shahrukh khan jawan sequel atlee reveals

Jawan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मागील वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. जवान चित्रपट साऊथचे दिग्दर्शक एटली कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. जजवानला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही केली. शाहरुख खान आणि दिग्दर्शक ॲटली कुमार (Atlee Kumar) यांनी जवानमध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले. नुकतेच ॲटली ‘जवान 2’ बद्दल बोलले आणी जवानचा सीक्वल येणार की नाही हे ॲटली यांनी सांगितले.

‘जवान’ ने भारतात एकूण ६४३.८७ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ ला प्रेक्षकांचं भरभरून मिळालेलं प्रेम आणी बॉक्स ऑफिसवर केलेली मोठी कमी पाहता. जवान च्या पहिल्या भागाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातल्याचे दिसून येते. अशातच किंग खानचे अनेक चाहतेही ‘जवान’ च्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. जवानचा सिक्वेल येणार आहे का? असा अनेकांना प्रश्न पडलाय.

हेही वाचा 👉 Kapkapiii Movie : तुषार कपूर आणी श्रेयस तळपदेचा ‘कपकपी’ चित्रपट लवकरच येतोय, दिग्दर्शक आपल्याला पोट धरून हसायला लावणारे.

👉 Kartik Aaryan: कार्तिक आर्यनला मिळाला एक बिग बजेट चित्रपट, ‘या’ मोठ्या दिग्दर्शकाच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक.

काही दिवसांपूर्वी जवानचे दिग्दर्शक ॲटली एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर ते मीडियाशी बोलत होता, तेव्हा त्यांना जवानच्या सिक्वेलबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.  यावर ॲटली म्हणाले, अद्याप तरी तस काही नक्की केलेल नाही, पण मी काहीतरी लिहीन. मी प्रेक्षकांना सरप्राईज देईन, प्रत्येक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची संधी असते, पण मला नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर न्हेऊन त्यांचे मनोरंजन करायचे आहे.त्यासाठी मी काहीतरी चांगलेच घेऊन येईन. पाहूया. अस ते म्हणाले.

त्यानंतर ॲटली यांना तुम्हाला शाहरुख खानसोबत काम करायच आहे का अस विचारण्यात आल. तेव्हा ॲटली म्हणाले की, हो, यात काही शंका नाही. आम्ही एकत्र काम करू, पण कधी, कसे, हे सर्व शाहरुख सरांवर अवलंबून आहे. ॲटली सध्या वरुण धवनसोबत बेबी जॉनमध्ये काम करत आहे. त्यांचा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा 👉 Baazigar Re-release: 31 वर्षानंतर पुन्हा रिलीज होत आहे शाहरुखचा ‘बाजीगर’.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस