Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जिवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

2 Min Read
Shahrukh Khan Death Threat After Salman Khan Police Complaint
शाहरुख खान - फोटो : इंस्टाग्राम@iamsrk

Shahrukh Khan : शाहरुख नेहमीच अंडरवर्ल्डच्या हिटलिस्टमध्ये असतो. याआधीही त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. (Shahrukh Khan receives death threat after Salman Khan, with an FIR filed at Bandra police station. Raipur-based Faizan Khan accused of threatening and demanding extortion).

सलमान खाननंतर आता बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला फैजान खान नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची  धमकी दिली आहे. त्याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार, रायपूर येथील आरोपीने अभिनेत्याकडे मोठी खंडणी मागितली आहे.

पोलिसांनी सुरू केला तपास

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार त्याला धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  छत्तीसगडमधील रायपूर येथे राहणाऱ्या फैजान नावाच्या व्यक्तीने धमकीचा फोन केला आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक तपासासाठी रायपूरला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. अभिनेता शाहरुख खानला धमकावल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३०८(४), ३५१(३)(४) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा कॉल छत्तीसगडमधील रायपूरमधून आल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नसला तरी, रायपूर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिस फैयाज खान नावाच्या व्यक्तीला शाहरुख खानला धमकावल्याबद्दल नोटीस बजावणार आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही धमकी मिळाली होती

शाहरुख खान नेहमीच अंडरवर्ल्डच्या हिटलिस्टमध्ये असतो. याआधीही त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या संदर्भात अभिनेत्याने पोलिसांत लेखी तक्रार केली होती, त्यानंतर त्याला Y+ सुरक्षा देण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस